Advertisements
Advertisements
प्रश्न
'अण्णा भाऊंची भेट' या पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.
लघु उत्तर
उत्तर
विठ्ठल उमप प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते फार चांगले गात असत. त्यांच्या आवाजात गोडवा होता. त्यांचा बुलंद पहाडी आवाज मोहून टाकणारा होता. ते इतरांशी प्रेमाने वागत असत. त्यांच्यासारखेच जगप्रसिद्ध साहित्यकार असलेले अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी त्यांच्या मनात खूप आदर होता. अण्णाभाऊंच्या निरोपावरून अण्णांना भेटायला ते चिरागनगर येथील त्यांच्या झोपडीत पोहोचले तेव्हा अण्णाभाऊंचे साधे राहणीमान पाहून त्यांना तिटकारा वाटला नाही कारण ते अण्णांच्या कलेचे मोठेपण जाणत होते. विठ्ठल उमप यांच्या रूपाने एक महान कलावंत अण्णांना भावलेला दिसतो यातूनच विठ्ठल उमप यांचे मोठेपण सिद्ध होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?