Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.
उत्तर
प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून 'साधी राहणी उच्च विचार' असलेल्या जगप्रसिद्ध साहित्यकाराचा परिचय झाल्याची भावना मनात निर्माण होते. अण्णा दीनदुबळ्यांच्या दुःखाचे वास्तव मांडणारे साहित्य निर्माण करत असत. त्याना भौतिक जगातील सुखसुविधांचा मोह नव्हता. मॉस्को मधील बँकेत त्यांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचे अमाप असे मानधन जमा असूनही ते अगदी सामान्य वस्ती असलेल्या चिरागनगरातील झोपडीत राहत होते. झोपडीत राहूनच मला दीनदुबळ्यांचे दु:ख अनुभवता येईल व वास्तवावर आधारित साहित्य निर्माण करू शकेल असे त्याचे मत होते. अशा प्रकारे अण्णांच्या रूपाने दीनदुबळ्यांच्या दु:खाची जाणीव असलेल्या एका महान साहित्यकाराचे दर्शन होते.