Advertisements
Advertisements
प्रश्न
अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांच्या सारांशावरून (सारणी) त्यांच्या किरणाकृती तयार करा.
अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा | ||||
अ.क्र. | वस्तूचे स्थान | प्रतिमेचे स्थान | प्रतिमेचे स्वरूप | प्रतिमेचा आकार |
1. | वस्तू ध्रुव आणि नाभी यांमध्ये | आरशाच्या मागे | आभासी, सुलटी | वस्तूपेक्षा मोठा |
2. | वस्तू नाभीवर | अनंत अंतरावर | वास्तव, उलट | खूपच मोठा |
3. | वस्तू वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये | वक्रता केंद्राच्या पलीकडे | वास्तव, उलट | वस्तूपेक्षा मोठा |
4. | वस्तू वक्रता केंद्रावर | वक्रता केंद्रावर | वास्तव, उलट | मूळ वस्तूएवढा |
5. | वस्तू अनंत अंतर व वक्रता केंद्र यांदरम्यान | वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये | वास्तव, उलट | वस्तूपेक्षा लहान |
6. | वस्तू अनंत अंतरावर | नाभीवर | वास्तव, उलट | वस्तूपेक्षा लहान |
थोडक्यात उत्तर
उत्तर
- वस्तू ध्रुव आणि नाभी यांमध्ये:
P: ध्रुव, C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, A'B': प्रतिमा, PB: वस्तूचे अंतर (u), PB': प्रतिमेचे अंतर
येथे प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते. ती आभासी, सुलट व वस्तूपेक्षा मोठी असते. (येथे विशालन धन असते.) - वस्तू नाभीवर:
C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, PB: वस्तूचे अंतर (u) येथे प्रतिमा अनंत अंतरावर तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूपेक्षा खूपच मोठी असते. - वस्तू वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये:
C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, A'B': प्रतिमा, PB: वस्तूचे अंतर (u), PB': प्रतिमेचे अंतर (v) येथे प्रतिमा वक्रता केंद्रापलीकडे तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूपेक्षा मोठी असते. (येथे विशालन ऋण असते.) - वस्तू वक्रता केंद्रावर:
C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, A'B': प्रतिमा, PB: वस्तूचे अंतर (u), PB': प्रतिमेचे अंतर (v)
येथे प्रतिमा वक्रता केंद्रावर तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूएवढी असते. (येथे विशालन ऋण असते.) - वस्तू अनंत अंतर व वक्रता केंद्र यांदरम्यान:
C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, A'B': प्रतिमा, PB: वस्तूचे अंतर (u), PB': प्रतिमेचे अंतर (v)
येथे प्रतिमा मुख्य नाभी आणि वक्रता मध्य यांदरम्यान तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूपेक्षा लहान असते. (येथे विशालन ऋण असते.) - वस्तू अनंत अंतरावर:
C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू
येथे प्रतिमा अंतर्गोल आरशाच्या मुख्य नाभीवर तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूपेक्षा खूपच लहान असते.
shaalaa.com
अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?