Advertisements
Advertisements
प्रश्न
गोलीय आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात?
थोडक्यात उत्तर
उत्तर
गोलाकार आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी चिन्ह संकेत:
कार्टेशिअन चिन्ह संकेतांनुसार, आरशाचा ध्रुव (P) आरंभ बिंदू मानतात आणि मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा X-अक्ष घेतात.
- वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात.
- मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात.
- आरंभबिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात तर डावीकडे मोजलेली अंतरे ऋण मानतात.
- मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे (ऊर्ध्व अंतरे) धन असतात.
- मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे (अधो अंतरे) ऋण असतात.
- अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते तर बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर धन असते.
shaalaa.com
गोलीय आरशाद्वारे परावर्तनासाठी कार्टेशिअन चिन्ह संकेत
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?