Advertisements
Advertisements
प्रश्न
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते?
टीपा लिहा
उत्तर
- औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र शिवाय अणु ऊर्जा केंद्रात आणि नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विदयुत केंद्र या दोन विद्युत केंद्रांत उष्णता ऊर्जा वापरली जाते.
- अणू ऊर्जा केंद्रात युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखे अणु वापरले जातात. या अणूंच्या अणुकेंद्रकाचे विखंडन केले जाते. यातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो.
- नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाइन वापरले जाते.
- सौर औष्णिक विद्युत केंद्रातही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून परावर्तक व शोषकांच्या साहाय्याने उष्णता निर्माण करून त्यापासून पाण्याची वाफ केली जाते. या वाफेवर टर्बाइन व टर्बाइनवर जनित्र चालवून सौर औष्णिक ऊर्जानिर्मिती केली जाते.
shaalaa.com
औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?
फरक स्पष्ट करा.
औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती.
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
भारतातील औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती केंद्रे.
चंद्रपूर येथील विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रकार
शेगडी : औष्णिक ऊर्जा : : शिलाई मशीन : ____________
कार्य लिहा.
संघनन यंत्र
औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जानिर्मिती केंद्रात सौर ऊर्जेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते.
जोड्या लावा.
स्तंभ 'अ' | स्तंभ 'ब' |
1) प्रदूषणकारी ऊर्जा | अ) धुरातील कण |
2) पर्यावरणस्नेही ऊर्जा | ब) औष्णिक ऊर्जा |
क) पवन ऊर्जा |