Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती.
फरक स्पष्ट करा
उत्तर
औष्णिक विद्युत निर्मिती | सौर औष्णिक विद्युत निर्मिती |
1. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेली उष्णता ऊर्जा वापरून औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. | 1. सूर्यकिरणांची उष्णता ऊर्जा वापरून सौर औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. |
2. उष्णता निर्मितीसाठी कोळशाचे ज्वलन बॉयलरमध्ये केले जाते. | 2. उष्णता निर्मितीसाठी सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्याची उष्णता मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केली जाते. |
3. ज्वलनाच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होते. या वाफेच्या शक्तीने टर्बाइन फिरते. त्यामुळे टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. | 3. सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाइन आणि टर्बाइन द्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. |
4. औष्णिक विद्युतनिर्मिती प्रदूषणकारी आहे. | 4. सौर औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी नाही. |
5. औष्णिक विद्युत निर्मिती वापरले जाणारे इंधन म्हणजे कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. | 5. सौर औष्णिक विद्युत- निर्मितीत वापरली जाणारी सौर ऊर्जा अमर्यादित आणि शाश्वत आहे. |
shaalaa.com
औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
औष्णिक विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या?
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रात उष्णता ऊर्जा वापरली जाते? ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गांनी मिळवली जाते?
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
भारतातील औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती केंद्रे.
चंद्रपूर येथील विद्युतनिर्मिती केंद्राचा प्रकार
शेगडी : औष्णिक ऊर्जा : : शिलाई मशीन : ____________
कार्य लिहा.
संघनन यंत्र
औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जानिर्मिती केंद्रात सौर ऊर्जेवर चालणारे टर्बाइन वापरले जाते.
जोड्या लावा.
स्तंभ 'अ' | स्तंभ 'ब' |
1) प्रदूषणकारी ऊर्जा | अ) धुरातील कण |
2) पर्यावरणस्नेही ऊर्जा | ब) औष्णिक ऊर्जा |
क) पवन ऊर्जा |