Advertisements
Advertisements
प्रश्न
अवकाश मोहिमांचे महत्त्व सांगा.
टीपा लिहा
उत्तर
- अवकाश मोहिमांमुळे संपूर्ण जग एकमेकांच्या संपर्कात आले आहे. आज आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही भागात असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधू शकतो.
- इंटरनेटमुळे कुठलीही माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. घरबसल्या जगभरातील घडामोडींची माहिती आपण प्राप्त करू शकतो.
- उपग्रहांच्या साहाय्याने नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळून सतर्क राहणे शक्य झाले आहे.
- लढाईत शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल आपल्याला माहिती मिळते.
- तसेच, भूगर्भात खनिज पदार्थांचा साठा कोठे आहे हे आपण जाणून घेऊ शकतो.
- अवकाश मोहिमांचे असे अगणित फायदे आहेत. आजच्या जगात अवकाश मोहिमा आणि अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही.
shaalaa.com
अवकाश मोहीमा (Space missions)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?