Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
लघु उत्तर
उत्तर
खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळांवर विपुल लेखन केले जाते.
- खेळांशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरिने प्रसिद्ध झालेली आहेत. खेळांविषयीचे कोश लिहिले जात आहेत.
- व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे, मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे.
- खेळांवर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडा जगत यासाठी राखून ठेवलेली असतात.
- षट्कार नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे. द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर, बाळ पंडित असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळांवर वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात.
- इंग्रजी भाषेत तर क्रीडाक्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते. अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडालेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळांच्या साहित्याचा इतिहास आहे.
shaalaa.com
खेळांचे साहित्य आणि खेळणी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?