Advertisements
Advertisements
प्रश्न
खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.
उत्तर १
खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध घनिष्ठ आहेत.
- खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो.
- खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो
- विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती द्यावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते.
- खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो.
- खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात, खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो.
उत्तर २
प्रस्तावना: खेळ व इतिहास या गोष्टी भिन्न असल्या तरीही त्यांच्यात जवळचा संबंध आहे.
१. उत्खननात खेळाच्या सापडलेल्या व प्राचीन ग्रंथात उल्लेखलेल्या खेळाच्या साहित्यातून इतिहासविषयक माहिती मिळते. उदा. भारतातील प्राचीन साहित्यात व महाकाव्यांमधून द्यूत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात.
२. याशिवाय, खेळाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते.
अ. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाही क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत. ऑलिंपिक, एशियाड स्पर्धा किंवा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने यांच्या संदर्भातील लेखन व समीक्षा करण्याकरता इतिहासाच्या अभ्यासकांची किंवा जाणकारांची मदत घ्यावी लागते.
ब. तसेच, खेळांचे सामने सुरू असताना त्याविषयक समीक्षापूर्ण निवेदन करण्याकरता इतिहास तज्ज्ञांची गरज असते. या तज्ज्ञांना संबंधित खेळाचा इतिहास, मागील आकडेवारी, खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधित ऐतिहासिक आठवण यासंदर्भातील माहिती देणे गरजेचे असते आणि याकरता इतिहास विषय उपयुक्त ठरतो.
निष्कर्ष: वरील विवेचनावरून असे म्हणता येईल, की खेळण्यांद्वारे इतिहास समजत असला तरी खेळाच्या क्षेत्रात इतिहासाचे ज्ञान उपयुक्त आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
२९ ऑगस्ट हा ______ यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून पाळला जातो.
इटलीतील ______ शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतील समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जिवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. |
१. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतील समालोचक कोण होते?
२. बाळ ज. पंडित यांना कशाचे उत्तम ज्ञान होते?
३. बाळ ज. पंडित यांच्या समालोचनाची वैशिष्ट्ये लिहा.
भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोडयांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिंपिक ही खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते. |
- प्राचीन ऑलिंपिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे?
- खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे?
- ऑलिंपिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा.