मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोडयांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिंपिक ही खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते.
  1. प्राचीन ऑलिंपिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे?
  2. खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे?
  3. ऑलिंपिक स्पर्धाविषयी आपले मत मांडा.
टीपा लिहा

उत्तर

  1. प्राचीन ऑलिंपिक खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे.
  2. खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे.
  3. क. ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा दर चार वर्षांनी होते. ग्रीस देशाने जगाला ऑलिम्पिक स्पर्धेची देणगी दिली.
    ख. प्राचीन ग्रीस नगरराज्यांमध्ये ऑलिम्पिया या नगरराज्यात दर चार वर्षांनी विविध खेळांच्या स्पर्धा होत असत.
    ग. धावणे, थाळीफेक, रथ व घोडयांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध हे खेळ ग्रीकांनी सुरू केले व खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप दिले.
    घ. आधुनिक ऑलिम्पिक खेळही दर चार वर्षांनीच होतात. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे सन्मानाचे मानले जाते; कारण जगभरातील खेळाडूंमधून हा सन्मान मिळत असतो. 
    ड़. एकमेकांत अडकवलेली पाच वर्तुळे, हे ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह असून ते पाच खंडांचे प्रतिनिधित्व करते. मैत्री, सद्‌भाव, ईर्षा, शांतता व संघभावना यांचे ते प्रतीक मानले जाते.
shaalaa.com
खेळ आणि इतिहास (परिचय)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्‍न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा:

खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.


खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.


२९ ऑगस्ट हा ______ यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडादिवस म्हणून पाळला जातो. 


इटलीतील ______ शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली.


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतील समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जिवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे.

१. क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतील समालोचक कोण होते?

२. बाळ ज. पंडित यांना कशाचे उत्तम ज्ञान होते?

३. बाळ ज. पंडित यांच्या समालोचनाची वैशिष्ट्ये लिहा. 


भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×