Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात.
टीपा लिहा
उत्तर
- मेजर ध्यानचंद हे त्या वेळेच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू आणि संघनायक होते.
- त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून दिली.
- १९३२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपानविरुद्ध २५ गोल केले.
- आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात ४०० च्या वर गोल केले.
म्हणून, मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हटले जाते.
shaalaa.com
खेळांचे प्रकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभटदादा देवधर यांनी ______ या खेळाची निर्मिती केली.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (४)
मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून. साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'प्रदूमभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले. |
- 'हॉकीचे जादूगार' कोणाला म्हणतात? (१)
- भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? (१)
- मेजर ध्यानचंद यांची ऑलिंपिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. (२)