Advertisements
Advertisements
प्रश्न
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर १
मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक पुढील बाबींचा द्वारे स्पष्ट करता येतो-
मैदानी खेळ | बैठे खेळ |
१. मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. |
१. बैठे खेळ बसून खेळावे लागतात ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर, कोठेही खेळता येतात. |
२. मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. | २. बैठ्या खेळांत तुलनेने कमी कसरती व कौशल्याची गरज असते. |
३. मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. |
३. या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते. |
४. शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळांत थकवा लवकर येतो. |
४. शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही. |
५. मैदानी खेळात थरारकता, रोमांच असतो. आनंदही अधिक मिळतो. |
५. बैठ्या खेळांत थरारकता नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो. |
६. मैदानी खेळांत शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते. |
६. बैठ्या खेळांना शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षण सरावाची तितकीशी गरज नसते. |
७. मैदानी खेळांमध्ये कबड्डी, हॉकी, खो-खो, क्रिकेट अशा देशी-विदेशी खेळांचा समावेश होतो. |
७. बैठ्या खेळांत कॅरम, बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो. |
८. बहुतेक सर्व मैदानी खेळांच्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. |
८. कॅरम, बुद्धिबळ अशा मोजक्याच बैठ्या खेळांच्या स्पर्धा सोडल्यास अन्य बैठ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नाहीत. |
उत्तर २
मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे 'खेळ' होय. खालील मुद्द्यांच्या आधारे मैदानी खेळ व बैठे खेळ यांतील फरक सांगता येईल.
मैदानी खेळ | बैठे खेळ |
१. स्वरूप | |
मैदानी खेळांसाठी मोकळ्या, विस्तृत व सुनियोजित जागेची गरज असते. | बैठे खेळ हे एका जागी बसून खेळले जातात त्यामुळे त्यासाठी फारशी जागा लागत नाही. |
२. नियम | |
मैदानी खेळ हे बैठ्या खेळांच्या तुलनेत अधिक तांत्रिक स्वरूपाचे असून त्यांना काटेकोर नियम असतात. खेळाडूंना ते नियम पाळावेच लागतात. | काही बैठ्या खेळांना विशिष्ट असे नियम नसतात. ते मुख्यत: आनंदासाठी खेळले जातात. तसेच ते खेळायला सोपे असतात. उदा. सागरगोटे, भातुकली. अपवाद: बुद्धिबळ, कॅरम या बैठ्या खेळांना काटेकोर नियम असतात. |
३. पूर्वतयारीची गरज/ शारीरिक तंदुरुस्ती | |
मैदानी खेळ खेळताना अधिक शारीरिक श्रम करावे लागतात. त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती राखून पुरेसा सरावही करावा लागतो. | मैदानी खेळांच्या तुलनेत बैठ्या खेळांसाठी कमी शारीरिक ऊर्जा खर्च होते. |
४. वातावरणीय अडथळे | |
मैदानी खेळ मोकळ्या जागेत खेळले जात असल्याने खेळताना वातावरणीय अडथळ्यांच्या सामना करावा लागू शकतो. उदा. पावसामुळे काही वेळा क्रिकेटचे सामने पुढे ढकलले जातात. |
बैठे खेळ बंदिस्त जागेत खेळले जातात. त्यामुळे, वातावरणीय बदलाचा या खेळांवर कोणताही परिणाम होत नाही |
५. उदाहरणे | |
क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, लगोरी इत्यादी. | भातुकली, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभटदादा देवधर यांनी ______ या खेळाची निर्मिती केली.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (४)
मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून. साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'प्रदूमभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले. |
- 'हॉकीचे जादूगार' कोणाला म्हणतात? (१)
- भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? (१)
- मेजर ध्यानचंद यांची ऑलिंपिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. (२)