मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे?

टीपा लिहा

उत्तर

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले-

  1. भारतात सध्या बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यांत काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. काही अपवाद सोडले, तर केंद्र व राज्यपातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणातही हा पक्ष प्रभावी होता, म्हणून या काळातील पक्षपद्धतीला 'एक प्रबळ पक्षपद्धती' म्हटले जाते.
  2. १९७७ साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले.
  3. १९८९ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकाच पक्षाचे सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकारावर आली.
  4. प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली. 
shaalaa.com
प्रादेशिक पक्ष
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.3: राजकीय पक्ष - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 2.3 राजकीय पक्ष
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (२)
बालभारती History and Political Science (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 2.3 राजकीय पक्ष
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×