Advertisements
Advertisements
Question
भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे?
Short Note
Solution
भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले-
- भारतात सध्या बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आहे. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यांत काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. काही अपवाद सोडले, तर केंद्र व राज्यपातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणातही हा पक्ष प्रभावी होता, म्हणून या काळातील पक्षपद्धतीला 'एक प्रबळ पक्षपद्धती' म्हटले जाते.
- १९७७ साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले.
- १९८९ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकाच पक्षाचे सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकारावर आली.
- प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली.
shaalaa.com
प्रादेशिक पक्ष
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष _______ येथे आहे.
जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर ________ या राजकीय पक्षात झाले.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
प्रादेशिक पक्ष
तक्ता पूर्ण करा.
दिलेला आकृतिबंध पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: