Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
स्पष्ट करा
उत्तर
विदेशी व्यापाराच्या भूमिकेचे समर्थन खालीलप्रमाणे करता येईल:
- परकीय चलन प्राप्ती: विदेशी व्यापारामुळे परकीय चलन प्राप्त होते. त्याचा वापर विविध उत्पादक कार्यांसाठी करता येतो. विदेशी व्यापार हा बाजार विस्तारीकरणासाठी आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय ठरतो.
- गुंतवणुकीस प्रोत्साहन: विदेशी व्यापार देशांतर्गत बाजारपेठेच्या पलीकडे जाण्याची उत्पादकांना संधी उपलब्ध करून देतो. त्यांना निर्यातीसाठी अधिक उत्पादन करण्याचे प्रोत्साहन मिळते. यामुळे देशातील एकूण गुंतवणूकीत वाढ होते.
- श्रमविभागणी आणि विशेषीकरण: विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रमविभागणी व विशेषीकरण होते. काही देशांत मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते. असे देश कच्च्या मालाची निर्यात करू शकतात. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे श्रमविभागणी आणि विशेषीकरण होऊन त्याचा सर्व देशांना लाभ होतो.
- संसाधनांचे पर्याप्त वाटप आणि वापर: विदेशी व्यापारामुळे दुर्मिळ संसाधने अशाच वस्तूंच्या उत्पादनाकडे वळविली जातात, ज्यांच्यापासून महत्तम लाभ प्राप्त होतो. अशा प्रकारे विदेशी व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संसाधनांचे पर्याय वाटप व वापर होतो.
- किंमतपातळीतील स्थैर्य: विदेशी व्यापारामुळे मागणी व पुरवठा यांची स्थिती स्थिर राहते. पर्यायाने अर्थव्यवस्थेतील किंमतपातळीत स्थैर्य निर्माण होते.
- बहुविध पर्यायांची उपलब्धता: विदेशी व्यापार ग्राहकांना बहुविध आयात वस्तू उपलब्ध करून देतो. विदेशी व्यापार तीव्र स्पर्धात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो गुणात्मक व उच्च दर्जाच्या उत्पादनाची खात्री देतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावतो.
- प्रतिष्ठा व नावलौकिक: निर्यातदार देश आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळवू शकतात. जो देश निर्यात व्यापारात सहभागी झालेला आहे, त्या देशाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पत प्राप्त होते. उदा., जपान, जर्मनी, स्वित्झरलँड यांसारख्या देशांनी उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात केल्यामुळे त्यांना विदेशी बाजारात मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळाला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?