मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

भौगोलिक कारणे दया. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भौगोलिक कारणे दया.

उद्योगधंद्याचे वितरण असमान असते.

कारण सांगा

उत्तर १

  1. उद्योगांचे वितरण विविध भौतिक घटकांवर अवलंबून असते, जसे की हवामान, कच्चा माल, पाणी आणि वीज पुरवठा, मजूर, वाहतूक, जमीन इत्यादी, तसेच आर्थिक घटकांवर, जसे की भांडवल, बाजारपेठ आणि सरकारी धोरणे.
  2. भौतिक आणि आर्थिक घटक प्रत्येक प्रदेशानुसार बदलतात, तर राजकीय घटक प्रत्येक देशानुसार वेगळे असतात. उद्योग त्या ठिकाणी विकसित होतात, जिथे भौतिक आणि आर्थिक घटक त्यांच्या विकासासाठी अनुकूल असतात, त्यामुळे उद्योगांचे वितरण असमान आहे.
  3. उदाहरणार्थ, भारतात मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, छोटानागपूर प्रदेश याठिकाणी उद्योग एकत्रित झाले आहेत, तर उर्वरित भागात कृषी हेच प्रमुख आर्थिक कार्य आहे.
shaalaa.com

उत्तर २

उदयोगांचे स्थान हे प्रामुख्याने कच्च्या मालाचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठ या तीन प्रमुख घटकांशी निगडित असते. अर्थात या घटकांशिवाय भांडवल, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, वाहतूक, शासकीय धोरण हे इतर घटकही तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. मात्र कच्चा माल हा पूर्णतः प्राकृतिक घटक असून, तो अवजड आहे की हलका आहे, तो नाशवंत आहे की टिकाऊ आहे, तो घटणाऱ्या वजनाचा आहे की शुद्ध स्वरूपाचा आहे (म्हणजे वजनात फरक न पडणारा) यांवर उदयोगांचे स्थान अवलंबून असते. साहजिकच लोह-पोलादासारखा उदयोग हा लोहखनिज या घटत्या वजनाचा कच्चा माल असल्यामुळे तो खाणकाम क्षेत्राजवळच स्थापन झालेला दिसतो. त्याचप्रकारे ऊस हा वजन घटणारा नाशवंत कच्चा माल असल्यामुळे साखर कारखाना ऊस उत्पादक क्षेत्राजवळच स्थापन झालेला दिसतो. याउलट सुती वस्त्र उदयोग हा स्थानमुक्त उदयोग आहे. याला कारण कापूस हा कच्चा माल आणि कापड हा पक्का माल यांच्या वजनात फारसा फरक पडत नाही. अशाच प्रकारचा प्रभाव पक्क्या मालाच्या स्वरूपावरही दिसून येतो. कधी कधी पक्का माल नाशवंत असतो. उदा., बेकरी उत्पादने. तर कधी पक्का माल हा खूप अवजड असतो. उदा., विविध फळांची पेये, असे उद्योग बाजारपेठेजवळ किंवा शहरांजवळ स्थायिक होतात.
विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल मग तो कृषिक्षेत्रातून असेल किंवा खनिज क्षेत्रात असेल किंवा वनक्षेत्रातून असेल; त्याचे वितरणही मुळात असमान असते. शिवाय त्यांची गुणवैशिष्ट्ये वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी असतात. साहजिकच या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून उदयोगांचे वितरणही असमान होते.

shaalaa.com
द्वितीयक आर्थिक क्रियावर परिणाम करणारे - इतर घटक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: द्वितीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 5 द्वितीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ३. १) | पृष्ठ ५४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×