Advertisements
Advertisements
प्रश्न
‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
उत्तर
रेखाजीचे कार्य हे राष्ट्र घडवण्याचेच कार्य आहे. अलीकडे समाजमाध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजाण मुलांना/मुलींना फसवतात. अशा प्रकरणांमध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते. कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायद्याची भीती घालतात, पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या कुशल प्रयत्नांमुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात. हे खरे तर आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे. एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे. आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
हा पाठ (वीरांगना) वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.
पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.
‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
'पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं', स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा.
देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
टिपा लिहा.
मुले भरकटण्याची कारणे
टिपा लिहा.
रेखाजींच्या कार्याचा परिणाम
'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.