Advertisements
Advertisements
प्रश्न
ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.
उत्तर १
- ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात.
- विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. याउलट, ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
- ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५°से ते २८°से आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.
- ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी २००० मिमी, तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमी पर्जन्य पडते.
- ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते. - अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
- ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो.
- ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमान तुलनेने अधिक असते. हा प्रदेश 'पर्जन्यछायेचा प्रदेश ' किंवा 'अवर्षण चतुष्कोन' म्हणून ओळखला जातो.
उत्तर २
- अक्षवृत्तीय विस्तार: ब्राझीलच्या हवामानात विविधता आढळून येते. याचे मुख्य कारण म्हणजे ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे. ब्राझीलच्या दक्षिणेस उत्तरेच्या तुलनेत कमी तापमान असते. तसेच, काही वेळा आकस्मित परिस्थितीत दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांमुळे या भागात बर्फवृष्टीदेखील होते.
- विषुववृत्त: ब्राझीलचा उत्तर भाग विषुववृत्तीय प्रदेशात मोडतो. येथे वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे, वर्षभर तापमान अधिक असते. तसेच, येथे वर्षभर अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. त्यामुळे, या भागातील हवामान उष्ण दमट असते.
- अजस्र कडा: ब्राझीलमध्ये आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय (व्यापारी) वाऱ्यांपासून पाऊस मिळतो; अजस्र कड्यामुळे किनारीभागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ईशान्येस या वार्यांचा प्रभाव कमी झाल्याने तेथे पर्जन्यछायेचा प्रदेश दिसून येतो.
- व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा क्षीण पट्टा: विषुववृत्तीय प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. तसेच, या भागात व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा क्षीण असल्याने वादळे फार क्वचित होतात.
- उच्चभूमी व सागरी किनारा: उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड आहे आणि पूर्वेस अटलांटिक महासागर असल्याने किनारपट्टीच्या प्रदेशातील हवामान सौम्य व आर्द्र आहे.
अशारीतीने, ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार व याबरोबरच प्राकृतिक रचना हे घटक हवामानावर परिणाम करताना दिसतात.
संबंधित प्रश्न
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात.
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
भौगोलिक कारणे लिहा:
ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
भौगोलिक कारणे लिहा:
ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
भारतातील हवामान व ब्रझील हवामान
ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?
खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख
प्रश्न-
- चारही शहरांतील तापमान कोणत्या महिन्यांत सर्वांत जास्त आहे?
- दिलेल्या शहरांत जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो?
- ब्राझीलमधील पर्जन्यऋतूचा कालावधी कोणता?
- कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे?
- 'रिओ दी जनेरिओ' मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल?
ब्राझीलमध्ये आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या ______ वाऱ्यांपासून पाऊस पडतो.
ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात?