Advertisements
Advertisements
प्रश्न
चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.
उत्तर
प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे वाढतच असते. मात्र, लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एक विशिष्ट स्थित्यंतरातून जात असतो. या स्थित्यंतराच्या दरम्यान देशाची लोकसंख्या वाढ पाच टप्प्यातून जाते त्याला लोकसंख्यावाढीच्या संक्रमणाचे टप्पे म्हणतात.
जेव्हा लोकसंख्या वाढीच्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून देश जात असतो, तेव्हा त्या देशात लोकसंख्येच्या विस्फोटाची स्थिती निर्माण झालेली असते. मात्र, या टप्प्यातून जेव्हा देश चौथ्या टप्प्यात जातो तेव्हा जन्मदर घटत जातो व मृत्युदरही घटत जातो. नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारते, वैदयकीय सेवासुविधा उपलब्ध असतात, लोक आपल्या आरोग्याबद्दल जास्त जागरूक होतात, मात्र, अशा परिस्थितीत लोकसंख्येचा वृद्धिदरही कमी होतो आणि त्यामुळे कार्यरत लोकसंख्येचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. असे देश अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून राहतात. मनुष्यबळाचा अभाव या देशांना जाणवू लागतो आणि त्यामुळे अशा देशांमध्ये जगाच्या इतर भागातून येणाऱ्या लोकांच्या स्थलांतराचा कल वाढतो.
यापुढच्या पाचव्या टप्प्यात जेव्हा देश जातो, तेव्हा तर जन्मदर अजून घटत जातो, मृत्युदरही अजून कमी झालेला असतो. काही प्रसंगी तर मृत्युदर जास्त आणि जन्मदर कमी अशी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे देशामध्ये बालकांची संख्या खूपच कमी होते आणि वृद्धांची संख्या खूप वाढते. थोडक्यात, अशा परिस्थितीत या देशात अवलंबित लोकांची संख्या वाढते, कार्यरत लोकांचे प्रमाण कमी होते आणि याचा परिणाम सुरुवातीस चांगल्या आर्थिक राहणीमानाच्या स्वरूपात दिसून येतो. मात्र, भविष्यात या देशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा.
भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.
लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते.
लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.