English

चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.

Answer in Brief

Solution

प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे वाढतच असते. मात्र, लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एक विशिष्ट स्थित्यंतरातून जात असतो. या स्थित्यंतराच्या दरम्यान देशाची लोकसंख्या वाढ पाच टप्प्यातून जाते त्याला लोकसंख्यावाढीच्या संक्रमणाचे टप्पे म्हणतात.
जेव्हा लोकसंख्या वाढीच्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून देश जात असतो, तेव्हा त्या देशात लोकसंख्येच्या विस्फोटाची स्थिती निर्माण झालेली असते. मात्र, या टप्प्यातून जेव्हा देश चौथ्या टप्प्यात जातो तेव्हा जन्मदर घटत जातो व मृत्युदरही घटत जातो. नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारते, वैदयकीय सेवासुविधा उपलब्ध असतात, लोक आपल्या आरोग्याबद्दल जास्त जागरूक होतात, मात्र, अशा परिस्थितीत लोकसंख्येचा वृद्धिदरही कमी होतो आणि त्यामुळे कार्यरत लोकसंख्येचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. असे देश अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून राहतात. मनुष्यबळाचा अभाव या देशांना जाणवू लागतो आणि त्यामुळे अशा देशांमध्ये जगाच्या इतर भागातून येणाऱ्या लोकांच्या स्थलांतराचा कल वाढतो.
यापुढच्या पाचव्या टप्प्यात जेव्हा देश जातो, तेव्हा तर जन्मदर अजून घटत जातो, मृत्युदरही अजून कमी झालेला असतो. काही प्रसंगी तर मृत्युदर जास्त आणि जन्मदर कमी अशी परिस्थिती उद्भवते. त्यामुळे देशामध्ये बालकांची संख्या खूपच कमी होते आणि वृद्धांची संख्या खूप वाढते. थोडक्यात, अशा परिस्थितीत या देशात अवलंबित लोकांची संख्या वाढते, कार्यरत लोकांचे प्रमाण कमी होते आणि याचा परिणाम सुरुवातीस चांगल्या आर्थिक राहणीमानाच्या स्वरूपात दिसून येतो. मात्र, भविष्यात या देशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते.

shaalaa.com
लोकसंख्या वाढ आणि विस्फोट
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: लोकसंख्या - भताग १ - स्वाध्याय [Page 11]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
Chapter 1 लोकसंख्या - भताग १
स्वाध्याय | Q ४. ३) | Page 11
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×