Advertisements
Advertisements
Question
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा.
Solution
लोकसंख्या संक्रमणातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा जन्मदर व मृत्युदर यात खूप मोठा फरक पडत जातो तेव्हा तिसऱ्या टप्प्यात मृत्युदर आणखी कमी होत जातो. मात्र त्याच वेळेस जन्मदरही कमी होत जातो. देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो, लोकांचे उत्पन्न वाढते, त्यांचे राहणीमान उंचावते, तंत्रज्ञानाचा विस्तार होतो तेव्हाच शैक्षणिक पातळी उंचावते. द्वितीय व तृतीय व्यवसायाचा विस्तार होतो आणि लोकांनाही कुटुंबनियोजनाचे महत्त्व पटल्यामुळे जन्मदर अजून कमी होत जातो. तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या भागात विकसनशील देशांचा विकसित देशाकडचा प्रवास सुरू होतो आणि म्हणूनच लोकसंख्या संक्रमणातील हा सगळ्यांत महत्त्वाचा टप्पा असतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.
लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते.
लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.
चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.