Advertisements
Advertisements
Question
लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि पाचव्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. या दोन्ही टप्प्यातील फरक सांगा.
Solution
प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे वाढतच असते. मात्र, लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एक विशिष्ट स्थित्यंतरातून जात असतो. या स्थित्यंतराच्या दरम्यान देशाची लोकसंख्या वाढ पाच टप्प्यातून जाते त्याला लोकसंख्यावाढीच्या संक्रमणाचे टप्पे म्हणतात.
जरी प्रत्येक देश या संक्रमणातून जात असला, तरी प्रत्येक देशातील संक्रमणाचे हे टप्पे वेगवेगळ्या कालखंडात घडून येतात. या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात प्रति हजारी ढोबळ जन्मदर आणि प्रति हजारी ढोबळ मृत्युदर हे दोन्ही दर सर्वाधिक असतात आणि सर्वसाधारणतः हे दर ३५ ते ४० च्यादरम्यान असतात. म्हणजेच, ढोबळ जन्मदर हा सुमारे ४० तर ढोबळ मृत्युदर हा सुमारे ३८ ते ४० च्यादरम्यान असतो. याचाच अर्थ जन्मदर आणि मृत्युदरातील तफावत फार कमी असते. एकंदरीत जास्त जन्मदर आणि जास्त मृत्युदर यामुळे एका अर्थी लोकसंख्या स्थिर असते आणि लोकसंख्येतील वाढ ही नगण्य असते किंवा लोकसंख्येत वाढ जवळ-जवळ होतच नाही.
$ त्यानंतरच्या तीन टप्प्यात लोकसंख्येच्या ढोबळ जन्मदरातील आणि मृत्युदरातील फरक हळूहळू वाढत जातो. सुरुवातीस जन्मदर जास्त आणि मृत्युदर कमी, नंतर जन्मदर जास्त आणि मृत्युदरात सातत्याने घट आणि त्यानंतर जन्मदरातही सातत्याने घट अशाप्रकारे तीन टप्पे पार पडतात.
शेवटच्या पाचव्या टप्प्यात ढोबळ जन्मदरात कमालीची घट दिसून येते. मात्र, तेव्हाच ढोबळ मृत्युदरातही कमालीची घट दिसून येते. या टप्प्यात ढोबळ जन्मदर व मृत्युदर हे सुमारे व प्रति हजारी ८ ते १० च्यादरम्यान दिसतात. थोडक्यात, या टप्प्यात पुन्हा एकदा पहिल्या टप्प्याप्रमाणे ढोबळ जन्मदर आणि मृत्युदर यातील फरक हा नगण्य असतो. त्यामुळेच एका अर्थी लोकसंख्या स्थिर असते आणि लोकसंख्येतील वाढ ही नगण्य असते किंवा लोकसंख्येत वाढ होताना दिसत नाही.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा.
भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते.
लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीय व्यवसायांची वाढ होते.
चौथ्या व पाचव्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील.
लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या.