Advertisements
Advertisements
प्रश्न
चेतना स्टोअर्सने 01 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,00,500 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा.
उत्तर
आऊटपुट टॅक्स (विक्रीच्या वेळी घेतलेला कर) = ₹ 1,22,500
इनपुट टॅक्स (खरेदीच्या वेळी दिलेला कर) = ₹ 1,00,500
∴ ITC (इनपुट टॅक्स क्रेडिट) = 1,00,500
∴ देय कर = आऊटपुट टॅक्स - इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC)
= 1,22,500 - 1,00,500
= ₹ 22,000
∴ चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी ₹ 22,000 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चंदीगढ हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय कर (CGST) व संघराज्याचा देय कर (UTGST) काढा. (संघराज्यात SGST ऐवजी UTGST असतो.)
मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने 6000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन साैंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10000 रुपयांना विकली, तर या व्यवहारासाठीचे मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची (CGST व SGST) देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा.
खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक (B2C) यासाठीचे करबीजक (Tax Invoice) तयार करा.
नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या.
पुरवठादार: मे ______ पत्ता ______ राज्य ______ तारीख ______ इनव्हॉइस क्रमांक ______ GSTIN ______
वस्तूचा तपशील:
मोबाइल बॅटरीचा दर | ₹ 200 | 1 नग | GST चा दर | 12 % | HSN 8507 |
हेडफोनचा दर | ₹ 750 | 1 नग | GST चा दर | 18 % | HSN 8518 |
खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे (B2B) टॅक्स इनव्हॉइस तयार करा.
नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या.
पुरवठादार - नाव, पत्ता, राज्य, GSTIN, बिल क्रमांक व तारीख.
प्राप्तकर्ता - नाव, पत्ता, राज्य GSTIN
वस्तूंचा तपशील:
(१) पेन्सिल बॉक्स 100, HSN 3924, दर ₹ 20, GST 12%
(२) जिग सॉ पझल्स 50, HSN 9503, दर ₹ 100, GST 12%
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.
स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18 % आहे, तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर ______ आकारण्यात येतो.
GSTIN मध्ये एकूण ______ अंकाक्षरे असतात.
श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयांना विकले. वस्तू व सेवा कराचा दर 5% असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट (ITC) व किती रुपये कर भरावा लागेल?
Z-सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिसेस व युनिफॉर्मस् इत्यादी बाबींवर एकूण 1,550 रुपये वस्तू सेवा कर भरला आहे, तर या कंपनीचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) ICT किती? त्यावरून देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा.
अण्णा पाटील (ठाणे, महाराष्ट्र) यांनी 14,000 रुपये करपात्र किमतीचा एक व्हॅक्युम क्लिनर वसई (मुंबई) येथील एका व्यापाऱ्यास 28% GST दराने विकला. वसईतील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्युम क्लिनर 16,800 रुपये करपात्र किमतीस विकला, तर या व्यवहारातील खालील किमती काढा.
- अण्णा पाटलांनी बनवलेल्या कर बीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल?
- वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल?
- वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे करभरणा करावयाचा केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर किती येईल ते काढा.