Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक (B2C) यासाठीचे करबीजक (Tax Invoice) तयार करा.
नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या.
पुरवठादार: मे ______ पत्ता ______ राज्य ______ तारीख ______ इनव्हॉइस क्रमांक ______ GSTIN ______
वस्तूचा तपशील:
मोबाइल बॅटरीचा दर | ₹ 200 | 1 नग | GST चा दर | 12 % | HSN 8507 |
हेडफोनचा दर | ₹ 750 | 1 नग | GST चा दर | 18 % | HSN 8518 |
उत्तर
मोबाइल बॅटरीचा दर = ₹ 200
CGST = 200 चे 6 % = `6/100 xx 200 = ₹ 12`
∴ CGST = SGST = ₹ 12
हेडफोनचा दर = ₹ 750
CGST = 750 चे 9 % = `9/100 xx 750 = ₹ 67.50`
∴ CGST = SGST = ₹ 67.50
वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस | |||||||||||
पुरवठादार: XYZ Mobile centre, GSTIN: 27PQRST2345K1Z4 18, Rajashree Business Park, Mumbai: 400086, Maharashtra Mob. No. 8234765820 Email: [email protected] Invoice No. GST/124 Invoice Date : 3–Jan –2019 |
|||||||||||
Sr. No |
HSN code | Name of product | Rate | Quantity | Taxable Amount | Rate | CGST | SGST | Total | ||
1 | 8507 | मोबाइल बॅटरी | ₹ 200 | 1 नग | 200 | 6% | Rate | Tax | Rate | Tax | ₹ |
2 | 8518 | हेडफोन | ₹ 750 | 1 नग | 750 | 9% | 6% | ₹ 12 | 6% | ₹ 12 | 224 |
9% | ₹ 67.5 | 9% | ₹ 67.5 | 885 | |||||||
एकूण रुपये | 79.5 | 79.5 | 1,109 |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चेतना स्टोअर्सने 01 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,00,500 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा.
मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने 6000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन साैंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10000 रुपयांना विकली, तर या व्यवहारासाठीचे मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची (CGST व SGST) देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा.
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.
स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18 % आहे, तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर ______ आकारण्यात येतो.
जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला उएऊ अंतर्गत _____ व्यवहार म्हणतात.
एका तयार कपड्यांच्या दुकानात 1000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल?
सुरत, गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 2.5 लाख करपात्र किमतीचे सुती कपडे राजकोट, गुजरात येथील व्यापाऱ्याला विकले, तर या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल?
Z-सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिसेस व युनिफॉर्मस् इत्यादी बाबींवर एकूण 1,550 रुपये वस्तू सेवा कर भरला आहे, तर या कंपनीचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) ICT किती? त्यावरून देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा.
एका ठोक व्यापाऱ्याने 1,50,000 रुपये करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्यास 1,80,000 रुपये करपात्र किमतीला विकले. किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 रुपये करपात्र किमतीला विकले, तर 18% दराने
- ठोक व किरकोळ विक्रीच्या करबीजकांतील करांची आकारणी करा.
- ठोक व्यापाऱ्याचा, तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा
खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक I, II, III मधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे गणन करा. GST दर 12% आहे.
- उत्पादकाने, वितरकाने व किरकोळ व्यापाऱ्याने (रिटेलरने) शासनाकडे किती रुपये वस्तू व सेवा कर कोणत्या शीर्षकाखाली भरला हे दाखवणारे विवरणपत्रक तयार करा.
- अंतत: ग्राहकास ती वस्तू किती रुपयांना पडेल?
- या साखळीतील B2B व B2C बीजके कोणती ते लिहा.