Advertisements
Advertisements
प्रश्न
चर्चा करा व लिहा.
विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती.
सविस्तर उत्तर
उत्तर
- सूर्यग्रहण: फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण हे अमावास्येलाच दिसते. सूर्यग्रहण आंशिक किंवा पूर्ण असते. काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते तेव्हा ‘खग्रास’ सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा ‘खंडग्रास’ सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचतात. सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे काळे चश्मे वापरावे.
-
चंद्रग्रहण: सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो. त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच दिसते. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर ‘खग्रास’ चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडली तर ‘खंडग्रास’ चंद्रग्रहण घडते. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येते. चंद्रग्रहण काही तास दिसू शकते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?