Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली, असे सद्यपरिस्थितीत म्हणता येईल. सुमेर राज्यात होऊन गेलेले राजे, यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षांपूर्वी सुमेर मधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवला आहे. |
१. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली?
२. सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे?
३. शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा.
टीपा लिहा
उत्तर
१. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली.
२. सर्वाधिक प्राचीन शिलालेख फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात आहे.
३.
१. अनेक ऐतिहासिक घटना वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये जतन केलेल्या आहेत. २.. हे शिलालेख आपल्याला समकालीन राजकीय, तसेच सामाजिक-आर्थिक स्थितीबद्दल माहिती देतात.
याचाच अर्थ, शिलालेखांद्वारे महत्त्वाची व विश्वासार्ह ऐतिहासिक माहिती मिळत असल्यामुळे शिलालेख हे इतिहासाचे साधन ठरते.
shaalaa.com
इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा (परिचय)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?