Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
डिस्कव्हरी ऑफ इंडिया भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण- महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, अफगाण आणि मोगलांचे आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशाह यांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाजसुधारक चळवळी आणि स्वातंत्र्यसंग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या. या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यांमुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली. |
१. भारत एक खोज ही मालिका कोणत्या ग्रंथावर आधारित होती?
२. भारत एक खोज या मालिकेत नेहरूंची भूमिका कोणी वठवली?
३. भारत एक खोज ही मालिका संपूर्ण भारतभर का वाखाणली गेली?
उत्तर
१. 'भारत एक खोज' ही मालिका पंडित नेहरू यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथावर आधारित आहे.
२. रोशन सेठ यांनी भारत एक खोज या मालिकेत नेहरूंची भूमिका वठवली होती.
३.
१. या मालिकेमध्ये भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला आहे.
२. या मालिकेतून हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण-महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क-अफगाण आणि मुघलांचे आक्रमण, मुघल कालखंड व मुघल बादशहांचे योगदान, भक्ती चळवळ, शिवाजी महाराजांचे कार्य, समाजसुधारणा चळवळी व स्वातंत्र्यसंग्राम यांसारख्या अनेक घटना प्रभावीपणे मांडल्या गेल्या.
३. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यांमुळे भारत एक खोज ही मालिका भारतभर वाखाणली गेली.