मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

प्राचीन काळी विविध देशांमध्ये बातम्या व संदेश कसे पोहचविले जात असत? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्राचीन काळी विविध देशांमध्ये बातम्या व संदेश कसे पोहचविले जात असत?

थोडक्यात उत्तर

उत्तर

१. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवायची असल्यास त्यासाठी दवंडी पिटवली जात असे. एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा माहितीचा प्रवास होत असे.

२. इसवी सन पूर्व काळात इजिप्तमध्ये सरकारी हुकूम कोरलेले लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत.

३. प्राचीन रोमन साम्रज्यामध्ये सरकारी हुकूम कागदावर लिहून काढून ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात असत. यामध्ये देश व राजधानीतील विविध घटनांची माहिती असे.

४. रोममध्ये ज्युलिअस सीझरच्या काळात त्याच्या अधिपत्याखाली 'ॲक्टा डायर्ना' (डेली ॲक्ट-रोजच्या घटना) नावाची वार्तापत्रे सार्वजनिक ठिकाणी लावत असत. सरकारी निवेदने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रभावी मार्ग होता.

५. चीनमध्ये इसवी सनाच्या सातव्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत.

६. तसेच, इंग्लंडमध्ये लढायांची अथवा महत्त्वपूर्ण घटनांची पत्रके अधूनमधून वाटली जात असत.

७. याशिवाय, धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी, फिरस्ते त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत.

८. याव्यतिरिक्त, राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील बातम्या राजदरबारात पाठवत असत.

अशारीतीने, वर्तमानपत्रे प्रकाशित होण्यापूर्वी बहुतांशी प्रत्यक्ष संदेशवाहक व्यक्तीच्या माध्यमातून, तर काही अंशी लिखित स्वरूपात प्रसारमाध्यमे अस्तित्वात होती.

shaalaa.com
प्रसारमाध्यमांची ओळख
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: प्रसारमाध्यमे आणि इतिहास - लांब उत्तरे २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1.5 प्रसारमाध्यमे आणि इतिहास
लांब उत्तरे २ | Q ५. १.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×