Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य
टीपा लिहा
उत्तर
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले:
- भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यानंतर वर्तमानपत्रे सुरू झाली आणि ती माहिती व ज्ञान प्रसाराच्या महत्त्वाच्या साधनांमध्ये समाविष्ट झाली.
- स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेत्यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यसंग्रामात मोठा सहभाग घेतला. समाजप्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या वर्तमानपत्रांनी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करून स्वातंत्र्यसंग्रामातील माहितीचा प्रसार केला.
- 'दर्पण' या अंकाने त्या काळातील राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती लोकांच्या समोर आणली.
- 'ज्ञानोदय' या वर्तमानपत्राने १८५७ च्या संघर्षाचे महत्त्वपूर्ण प्रसंग आणि बातम्या प्रसिद्ध केल्या.
- बहुजन समाजाच्या समकालीन परिस्थितीचे विवेचन 'दीनबंधू' या वृत्तपत्रातून करण्यात आले.
- 'केसरी' आणि 'मराठा' या वर्तमानपत्रांनी त्या काळातील सामाजिक व राजकीय समस्यांवर प्रकाश टाकला.
shaalaa.com
प्रसारमाध्यमांची ओळख
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?