मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ असून त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. अनिल काकोडकरांचे हे व्यक्तिमत्त्व घडले ते त्यांच्या जीवनातील अनुभवांनी. कोणत्या अनुभवातून काय शिकावे याची उत्तम पारख त्यांना असल्याचे या पाठातून जाणवते. डॉ. अनिल काकोडकरांच्या मनात डॉ. होमी भाभांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाला अजरामर स्थान असल्याचेही लक्षात येते. अशा मोठ्या व्यक्तींच्या विचारांचा आदर करणे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर अंमल करणे यातून त्यांच्यातील आज्ञाधारकपणा, प्रामाणिकपणा दिसून येतो. डॉ. अनिल काकोडकर हे आपल्या कामावर प्रचंड निष्ठा असलेले, जबाबदारीने काम पूर्ण करणारे, स्वप्रेरणेने अधिक कष्ट घेऊन काम करणारे, स्वत:चा मार्ग स्वत: शोधणारे असे व्यक्तिमत्त्व आहे. 'स्काय इज द लिमिट' या स्थितीचा अनुभव घेणारे, 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे कार्य करणारे, अनुभवाद्वारे शिक्षणावर विश्वास असणारे डॉ. अनिल काकोडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते.

shaalaa.com
मोठे होत असलेल्या मुलांनो...
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.2: मोठे होत असलेल्या मुलांनो... - स्वाध्याय

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
पाठ 4.2 मोठे होत असलेल्या मुलांनो...
स्वाध्याय | Q १.

संबंधित प्रश्‍न

टिपा लिहा.

बार्क


टिपा लिहा.

डॉ. होमी भाभा


'स्काय इस द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.


मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?


‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.


‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.


लेखकाचा बार्कमधील अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.


वैज्ञानिक व विद्यार्थी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.


खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.

  1. टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
  2. 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
  3. 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॉक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.

'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×