मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

'स्काय इस द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'स्काय इस द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे. 

लेखक 'भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर' च्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असताना तेथे त्यांच्यासह सुमारे शंभर मुले-मुली दाखल झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी नेमलेल्या सर्वांना पुरेल एवढे काम बार्कमध्ये आहे का, असा प्रश्न प्रशिक्षणार्थींना पडला होता. त्यावेळी डॉ. होमी भाभा यांनी त्यांना ’तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचे ते आपणच ठरवले पाहिजे. बॉसने आपल्याला सांगितलं असेल तेवढंच काम करायचं आणि काही सांगितलं नसेल तेव्हा आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चुकीची गोष्ट आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे.“ असे मोलाचे मार्गदर्शन केले. लेखकाने त्यांनी दिलेल्या या सूचनेचे तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर आपले काम आपणच शोधल्यास 'स्काय इज द लिमिट' अशी परिस्थिती खरोखरच निर्माण होत असल्याचा अनुभव घेतला. म्हणजेच, एखादे काम करताना वरिष्ठ सांगतील तेवढे आणि तेवढेच न करता आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. स्वत: जबाबदारी घेऊन, स्वप्रेरणेने अधिकाधिक कष्ट घेऊन ते काम पूर्ण केले पाहिजे. आपण स्वत:च स्वत:ला घडवले, ऊर्जा मिळवली, स्वत:चे मार्ग स्वत:च शोधले, की 'स्काय इज द लिमिट' अशी परिस्थिती निर्माण होते.

shaalaa.com
मोठे होत असलेल्या मुलांनो...
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.2: मोठे होत असलेल्या मुलांनो... - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 4.2 मोठे होत असलेल्या मुलांनो...
स्वाध्याय | Q (२) | पृष्ठ १६

संबंधित प्रश्‍न

टिपा लिहा.

बार्क


मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?


‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.


‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.


डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा.


लेखकाचा बार्कमधील अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.


वैज्ञानिक व विद्यार्थी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.


खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.

  1. टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
  2. 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
  3. 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॉक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.

'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×