Advertisements
Advertisements
प्रश्न
(दुपार) पाठात आलेल्या ‘दुपार’च्या विविध रूपांचे वर्णन करा.
उत्तर
दुपार जेव्हा शेतात जाते तेव्हा ती आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते. तेव्हा ही दुपार आईप्रेमाणे प्रेमळ भासते. वडाच्या झाडावर दुपारी पक्षांचा किलबिलाट थांबलेला असतो आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडाच्या सावलीत बिचारे पक्षीदेखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. तेव्हा जणू काय दुपार अंगाई गीत गात असते. आणखी उत्साहाने काम करण्यासाठी सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणाऱ्या दुपारमध्ये प्रोत्साहक मित्राचे रूप पाहायला मिळते. तीच दुपार जनावरांना छान आराम करा असं प्रेमळपणे सांगत असते. कामगारांना कार्यरत राहा असा संदेश देत असताना ही दुपार एखाद्या बापासारखी भासते. दुपारच्या सुट्टीत मुलं डबा खाऊन थोडा खेळ आणि मस्तीही करतात तेव्हा त्यांच्यासोबत ही दुपारही खेळकर मुलासारखी भासते. ‘दुपार’ पाठात याप्रमाणेच दुपारची विविध रुपे पहायला मिळतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तुलना करा.
कष्टकऱ्यांची दुपार | लेखनिकांची दुपार | |
(१) | ||
(२) | ||
(३) | ||
(४) |
कोण ते लिहा.
दुपारला आनंद देणारा घटक -
कोण ते लिहा.
दुपारच्या दृष्टीने एकविसाव्या शतकातील श्रमजीवी -
कोण ते लिहा.
सृष्टिचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक -
कोण ते लिहा.
वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ -
आकृतिबंध पूर्ण करा.
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
रस्ता - ______
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
पर्वत - ______
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
ज्ञानी - ______
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
डौल - ______
खाली काही शब्दाचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा.
काळजी - ______
‘माझी मे महिन्यातील दुपार’ याविषयी आठ ते दहा वाक्ये लिहा.
‘दुपार’ या ललितलेखातील कोणता प्रसंग तुम्हांला अधिक आवडला, ते सविस्तर लिहा.
तीनही ऋतूंतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा.