मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ या कवितेचे रसग्रहण करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ या कवितेचे रसग्रहण करा.

टीपा लिहा

उत्तर

प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे, याचे व तिच्या सौंदर्याच्या विभ्रमांचे भावोत्कट आलेखन करणे ही 'दवांत आलीस भल्या पहाटे' या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रेयसीच्या भेटीची आतुरता व त्यातील कातर व्याकूळता हा या प्रेमकवितेचा स्थायिभाव आहे.
शुक्राच्या तेजस्वी आभेमध्ये तोऱ्यात येणारी प्रेयसी विरळ, धूसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून निघून जाते. या दरम्यानची मानसिक घालमेल कवीने उत्कट व अनोख्या प्रतिमांमधून साकार केली आहे. अनेक गूढरम्य भावनांचे जाळे या कवितेत कवीने विणले आहे. समकालीन प्रेम कवितेत आढळून न येणाऱ्या वेगळ्या भावरम्य प्रतिमा कवीने या कवितेत मांडल्या आहेत.

'प्रेमभावनेचे हिरवे धागे', 'डोळ्यांमधील डाळिंबांचा पारा', 'आठवणींची रांग', 'तांबुस नखांवरील शुभ्र चांदण्या', 'पावलांचा गंध' इत्यादी भावगर्भ प्रतिमांतून प्रेमभावनेतील व्याकूळता प्रत्ययकारी रीतीने प्रकट झाली आहे. रसिकाला खिळवून ठेवणारी ही प्रतिसृष्टी केवळ अनोखी आहे.
प्रेमात बुडून गेलेल्या जिवासाठी प्रेयसीचे अनोळखी वर्तन हृदयाला पीळ पाडणारे आहे. तसेच प्रेमातील हेच भागधेय आहे की काय? प्रेमाची परिणती विरहात होते का? केवळ उराशी स्मृती व प्रेमगंध जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का? इत्यादी चिंतनशील आशय या कवितेतून दृग्गोचर होत राहतो.
'अनुष्टुभ' छंदात बांधलेली ही यमकप्रधान रचना तिचा अंतर्गत नाद व लय यांमळे रसिकाच्या ओठांत गुणगुणत राहते. विविध भाषिक प्रयोग करण्याचा कवी बा.सी.मर्डेकर यांचा हातखंडा या कवितेतही दिसून येतो.

shaalaa.com
दवांत आलिस भल्या पहाटीं
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं - कृती [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
पाठ 1.06 दवांत आलिस भल्या पहाटीं
कृती | Q (६) | पृष्ठ २८

संबंधित प्रश्‍न

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे -


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

हिरवे धागे म्हणजे


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

सांग धरावा कैसा पारा! म्हणजे -


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

अभ्रांच्या शोभेंत एकदा म्हणजे -


प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा.

  1. प्रेयसीचे नाव काय?
  2. ती वळून पाहणे का विसरली असावी?
  3. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
  4. ती कुठे राहते?
  5. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
  6. तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
  7. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
  8. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा
तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्यकाळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?


खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

विरल, सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.


सूचनेप्रमाणे सोडवा.

‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीची प्रेयसी केव्हा आली?


एका वाक्यात उत्तर लिहा.

डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?


एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?


एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती? 


एका वाक्यात उत्तरे लिहा :

'अनोळख्याने' हा शब्द कोणासाठी वापरला आहे?


'डोळयांमधल्या डाळिंबांचा, सांग धरावा कैसा पारा!' या काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.


'जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा.' या ओळींमधील भाव सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.


'दवांत आलिस भल्या पहाटीं' कवितेत तुम्हांला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×