मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

'दवांत आलिस भल्या पहाटीं' कवितेत तुम्हांला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.

टीपा लिहा

उत्तर

बा. सी. मर्ढेकर यांच्या बहुतांश कविता मानवी जीवनातील नगण्यता व वैफल्यग्रस्तता चितारीत करणाऱ्या आहेत. त्या भावोत्कट आहेतच पण चिंतनशीलता हा त्यांचा स्थायीभाव आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत 'दवांत आलीस भल्या पहाटीं' ही कविता वेगळी ठरते. प्रेमभावनेने ओथंबलेली ही कविता त्यातील व्याकूळतेमुळे मनाला भिडते. प्रेयसीचे येणे व जाणे हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे, हा संभ्रम कवितेच्या प्रत्येक कडव्यात तरळत राहतो. गतकाळातील प्रेमाची तिला विस्मृती झाली आहे की काय? प्रेमीजीवनात विरह प्रबळ ठरतो का? प्राक्तनाच्या रेषा चुकीच्या असतात का? नजरेतील प्रेम भाव हरवून आठवणी बुजून जातात का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न या कवितेत निर्माण होतात व प्रेम जीवनातील हतबलता प्रकर्षाने काळजाला पोखरत नेते. शेवटी स्मरणगंध उराशी जपावा हेच कवीचे भागधेय (नशीब) ठरते.
समकालीन प्रेमकवितेतील आनंददायी उत्कट आविष्कार, प्रस्तुत कवितेत दिसून येत नाही, प्रेमभावनेचा वेगळा दृष्टिकोन या कवितेत प्रत्ययास येत असल्यामुळे ही प्रेमकविता वेगळी व अनोखी ठरली आहे.

shaalaa.com
दवांत आलिस भल्या पहाटीं
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं - कृती [पृष्ठ २८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
पाठ 1.06 दवांत आलिस भल्या पहाटीं
कृती | Q (५) | पृष्ठ २८

संबंधित प्रश्‍न

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे -


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

हिरवे धागे म्हणजे


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

सांग धरावा कैसा पारा! म्हणजे -


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

अभ्रांच्या शोभेंत एकदा म्हणजे -


प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा.

  1. प्रेयसीचे नाव काय?
  2. ती वळून पाहणे का विसरली असावी?
  3. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
  4. ती कुठे राहते?
  5. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
  6. तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
  7. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
  8. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी?


खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

विरल, सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.


सूचनेप्रमाणे सोडवा.

‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीची प्रेयसी केव्हा आली?


एका वाक्यात उत्तर लिहा.

डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?


एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?


एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे कोणती? 


एका वाक्यात उत्तरे लिहा :

'अनोळख्याने' हा शब्द कोणासाठी वापरला आहे?


खालील चौकटी पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह कवितेतील छंद
       

'जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा.' या ओळींमधील भाव सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.


‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ या कवितेचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×