मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश

फरक स्पष्ट करा

उत्तर

  कार्यात्मक प्रदेश औपचारिक प्रदेश
(१)  एखादया विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे एखादे प्रमुख कार्य याआधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होय.  एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्ये असलेला एकजिनसी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय.
(२)  कार्यात्मक प्रदेश एकजिनसी असतोच असे नाही. औपचारिक प्रदेशात एक प्रमुख घटक असतो आणि हा घटक त्या प्रदेशाची निश्चित सीमारेषा ठरवतो.
(३) कार्यात्मक प्रदेशात अनेक प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घटकांची सरमिसळ दिसून येऊ शकते. औपचारिक प्रदेशाची एक किंवा अनेक समान वैशिष्ट्ये असतात.
(४) एका अर्थी कार्यात्मक प्रदेश हा तुलनेने वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा प्रदेश असतो. औपचारिक प्रदेश हा एकजिनसी प्रदेश असतो.
५) कार्यात्मक प्रदेशाची सीमारेषा ही लवचीक असते आणि काळाप्रमाणे ती सतत बदलत राहते. समान उंची, समान भूरूप, समान हवामान घटक यांसारखे प्राकृतिक घटक; समान पिक प्रदेश, समानार्थी क्रिया यांसारखे आर्थिक घटक किंवा समान भाषा यासारखा सांस्कृतिक घटक औपचारिक प्रदेश निश्चित करतो.
(६)  दळणवळण, वाहतूक, शहरी-ग्रामीण संबंध, शहर व उपनगरे अशा स्वरूपाच्या परस्परसहकार्याने आणि परस्परसहमतीने कार्यरत असणारे प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होत औपचारिक प्रदेश हा मूलभूत भौगोलिक एकक असणारा प्रदेश असतो.
(७) कार्यात्मक प्रदेश हे मूलभूत सांस्कृतिक, सामाजिक किंवा आर्थिक एकक असणारा प्रदेश असतो. पर्वतीय प्रदेश, मृदा प्रदेश, वनप्रदेश, नयांची खोरी हे सर्व औपचारिक प्रदेश होत.
shaalaa.com
प्रदेशांचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: प्रदेश आणि प्रादेशिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास
स्वाध्याय | Q २. १) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×