Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश
Distinguish Between
Solution
कार्यात्मक प्रदेश | औपचारिक प्रदेश | |
(१) | एखादया विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे एखादे प्रमुख कार्य याआधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होय. | एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्ये असलेला एकजिनसी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय. |
(२) | कार्यात्मक प्रदेश एकजिनसी असतोच असे नाही. | औपचारिक प्रदेशात एक प्रमुख घटक असतो आणि हा घटक त्या प्रदेशाची निश्चित सीमारेषा ठरवतो. |
(३) | कार्यात्मक प्रदेशात अनेक प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घटकांची सरमिसळ दिसून येऊ शकते. | औपचारिक प्रदेशाची एक किंवा अनेक समान वैशिष्ट्ये असतात. |
(४) | एका अर्थी कार्यात्मक प्रदेश हा तुलनेने वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा प्रदेश असतो. | औपचारिक प्रदेश हा एकजिनसी प्रदेश असतो. |
५) | कार्यात्मक प्रदेशाची सीमारेषा ही लवचीक असते आणि काळाप्रमाणे ती सतत बदलत राहते. | समान उंची, समान भूरूप, समान हवामान घटक यांसारखे प्राकृतिक घटक; समान पिक प्रदेश, समानार्थी क्रिया यांसारखे आर्थिक घटक किंवा समान भाषा यासारखा सांस्कृतिक घटक औपचारिक प्रदेश निश्चित करतो. |
(६) | दळणवळण, वाहतूक, शहरी-ग्रामीण संबंध, शहर व उपनगरे अशा स्वरूपाच्या परस्परसहकार्याने आणि परस्परसहमतीने कार्यरत असणारे प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होत | औपचारिक प्रदेश हा मूलभूत भौगोलिक एकक असणारा प्रदेश असतो. |
(७) | कार्यात्मक प्रदेश हे मूलभूत सांस्कृतिक, सामाजिक किंवा आर्थिक एकक असणारा प्रदेश असतो. | पर्वतीय प्रदेश, मृदा प्रदेश, वनप्रदेश, नयांची खोरी हे सर्व औपचारिक प्रदेश होत. |
shaalaa.com
प्रदेशांचे प्रकार
Is there an error in this question or solution?