Advertisements
Advertisements
Question
कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारावर प्रदेश वेगळे केले जातात? उदाहरणे द्या.
Solution
प्रदेशाचे स्वतंत्र गुणधर्म असतात आणि विविध घटकांच्या आधारे विविध प्रकारे प्रदेश ठरवले जातात. मात्र असे असले तरी प्रदेशाचे दोन प्रमुख प्रकार आढळतात :
(अ) औपचारिक प्रदेश:
(१) एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्ये असलेला एकजिनसी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय.
(२) औपचारिक प्रदेशात एक प्रमुख घटक असतो आणि हा घटक त्या प्रदेशाची निश्चित सीमारेषा ठरवतो.
(३) औपचारिक प्रदेशाची एक किंवा अनेक समान वैशिष्ट्ये असतात.
(४) औपचारिक प्रदेश हा एकजिनसी प्रदेश असतो.
(५) समान उंची, समान भूरूप, समान हवामान घटक यांसारखे प्राकृतिक घटक; समान पिक प्रदेश, समानार्थी क्रिया यांसारखे आर्थिक घटक किंवा समान भाषा यासारखा सांस्कृतिक घटक औपचारिक प्रदेश निश्चित करतो.
(६) औपचारिक प्रदेश हा मूलभूत भौगोलिक एकक असणारा प्रदेश असतो.
(७) पर्वतीय प्रदेश, मृदा प्रदेश, वनप्रदेश, नदयांची खोरी हे सर्व औपचारिक प्रदेश होत.
(ब) कार्यात्मक प्रदेश:
एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे एखादे प्रमुख कार्य याआधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होय.
(१) कार्यात्मक प्रदेश एकजिनसी असतोच असे नाही.
(२) कार्यात्मक प्रदेशात अनेक प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घटकांची सरमिसळ दिसून येऊ शकते.
(३) एका अर्थी कार्यात्मक प्रदेश हा तुलनेने वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा प्रदेश असतो.
(४) कार्यात्मक प्रदेशाची सीमारेषा ही लवचीक असते आणि काळाप्रमाणे ती सतत बदलत राहते.
(५) दळणवळण, वाहतूक, शहरी-ग्रामीण संबंध, शहर व उपनगरे अशा स्वरूपाच्या परस्परसहकार्याने आणि परस्परसहमतीने कार्यरत असणारे प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश होत.
(६) कार्यात्मक प्रदेश हे मूलभूत सांस्कृतिक, सामाजिक किंवा आर्थिक एकक असणारे प्रदेश असतात.
(७) एखाद्या शहराचा महानगर प्रदेश दूरदर्शन, रेडिओ यांचे प्रसारण होणारा प्रदेश ही कार्यात्मक प्रदेशाची काही उदाहरणे आहेत.
(८) पुणे महानगर प्रदेशात पुणे शहर, त्याच्या आजूबाजूचे प्रदेश, पुणे शहराची उपनगरे आणि पुणे शहर आपल्या भाजीपाला, फुले व इतर नाशवंत पदार्थांसाठी या आजूबाजूच्या प्रदेशांवर अवलंबून आहे, असे सर्व क्षेत्र यांचा पुणे महानगर प्रदेशात समावेश होतो.