English

दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे निर्देशक नाही. स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे निर्देशक नाही. स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

दरडोई उत्पन्न म्हणजे एकूण लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय स्थूल उत्पादन यांचे गुणोत्तर होय. याचा अर्थ एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा देशातील प्रतिमाणशी वाटा म्हणजे दरडोई उत्पन्न म्हटले जाते. अर्थात ही संकल्पना केवळ गणितीय संकल्पना असून दरडोई उत्पन्नाची मोजदाद केलेले उत्पन्न प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाते किंवा पोहोचतेच असे नाही. ही एक ढोबळ संकल्पना आहे.
दरडोई उत्पन्नातला एक दुसरा घटकही महत्त्वाचा ठरतो. जर प्रदेशात विकासाच्या पातळीत खूप जास्त विषमता असेल, तरी देशातील काही प्रांत, प्रदेश आणि काही लोकच या विकासाचे भागीदार असतील आणि त्या विकासाचा त्यांना प्रत्यक्ष लाभ होत असेल, तरी दरडोई उत्पन्नाच्या वितरणात प्रादेशिक विषमता ही कुठल्याही प्रकारे गृहीत धरली जात नाही. त्यामुळे खूप जास्त प्रादेशिक विषमता असेल, तरी दरडोई उत्पन्न अंक जास्त येऊनही प्रत्यक्षात खूप जास्त लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालील असण्याचा संभव आहे.
याचा अर्थ दरडोई उत्पन्न हा प्रादेशिक विकासाचा एकमेव निर्देशक होऊ शकत नाही. शिक्षणाच्या संधी, साक्षरतेचे प्रमाण, आरोग्याच्या सेवा सुविधा, गुन्हेगारीचे प्रमाण, रोजगाराच्या संधी, आयुर्मान आणि प्रत्यक्ष क्रयशक्ती अशा इतर अनेक घटकांचा विचार प्रादेशिक विकासाचे निर्देशक ठरवताना करावा लागेल.

shaalaa.com
प्रादेशिक विकास
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: प्रदेश आणि प्रादेशिक विकास - स्वाध्याय [Page 74]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
Chapter 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास
स्वाध्याय | Q ५. ३) | Page 74
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×