Advertisements
Advertisements
Question
कायम पिकांखालील भूमी व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यांचा स्पिअरमॅनचे गुणानुक्रम सहसंबंधांचा वापर करून सहसंबंध गणना करा व तुमच्या शब्दात निष्कर्ष लिहा. (तक्ता ७.५)
Solution
तक्ता क्रमांक ७.५ मधील कायम पिकांखालील भूमी व देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न या दोन रकान्यांमधील माहितीला गुणानुक्रम देऊन स्पिअरमॅन गुणानुक्रम सहसंबंध ठरवला गेला तो+०.५८ इतका आला.
यावरून असे दिसते की, कायम पिकांखालील भूमी आणि देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यांमध्ये सकारात्मक सहसंबंध आहे. मात्र हा सहसंबंध तीव्र स्वरूपाचा सहसंबंध नाही. देशाची पिकांखालील भूमी जास्त याचा अर्थ जलसिंचनाच्या सोयी जास्त, कृषी उत्पादन जास्त आणि कृषी उत्पादनांवर आधारित उदयोग यांचे प्रमाणही जास्त. साहजिकच त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते.
मात्र देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर पडण्याचे पिकांखालील क्षेत्र हा एकमेव निकष असत नाही/असू शकत नाही. म्हणूनच या दोन घटकांमधील सहसंबंध सकारात्मक जरी असला, तरी तो साधारण ०.६ च्या आसपास आहे.