Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
लाभांश व व्याज
फरक स्पष्ट करा
उत्तर
मुद्दे | लाभांश | व्याज |
अर्थ | लाभांश म्हणजे भागधारकाच्या भांडवल गुंतवणुकीवरील परताव्याची रक्कम होय. | कंपनीच्या धनकोंना कर्जासाठी दिला जाणारा परतावा आहे. जसे: कर्जरोखेधारक ठेवीदार. |
कोणाला दिले जाते? | लाभांश सभासदांना दिला जातो. म्हणजेच कंपनीच्या मालकांना दिला जातो. | व्याज कंपनीच्या धनकोंना दिले जाते. |
बंधन | जेव्हा कंपनीने नफा कमवला असेल तेव्हाच लाभांश देय असतो. लाभांश देण्याची सक्ती नाही. | हे कंपनीच्या नफ्याशी जोडलेले नाही. व्याज देणेहेबंधन आहे आणि ते कंपनीने सक्तीने दिले पाहिजे. |
कधी दिला जातो? | सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर व नफा पुरेसा असल्यास लाभांश दिला जातो. | कंपनीच्या नफ्याची पर्वा न करता व्याज दरवर्षी देय असते. |
दर | समहक्क भागधारकांना अस्थिर दराने लाभांश दिला जातो. तो कंपनीच्या नफ्याशी जोडलेला असतो. | व्याजाचा दर हा प्रतिभूतीच्या वाटपावेळी निश्चित आणि निर्धारित केला जातो. |
ठराव | अंतिम लाभांश वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सामान्य ठराव व अंतरिम लाभांश वाटपासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करावा लागतो. | व्याज देण्यासाठी कोणत्याही सभेत ठराव संमत करण्याची आवश्यकता नाही. |
उपचार/उपचारात्मक बाब | लाभांश हा नफ्याचा विनियोग आहे. | व्याज हे नफ्यावरील आकार आहे. |
shaalaa.com
व्याज
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?