Advertisements
Advertisements
प्रश्न
कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
कर्मचारी भाग विकल्प योजना (ESOS):
- कर्मचारी भाग विकल्प योजने अंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी (Holding) किंवा दुय्यम कंपनी (Subsidiary) याचे कायम कर्मचारी, संचालक आणि अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्व निश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात.
- ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण करते.
- कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात.
कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत:
- कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष/थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते.
- वाटप केलेल्या भागाचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी असते.
- कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन कालावधी एक वर्षाचा असतो.
- सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते म्हणजेच ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही. किमान धारण कालावधी एक वर्षाचा असतो.
- जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करीत नाही तो पर्यंत लाभांश आणि मतदानाच्या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाही.
- या प्रकारचे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भाग धारकाच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. कर्मचारी या योजने अंतर्गत खरेदी केलेले भाग हस्तांतर करू शकत नाहीत किंवा गहाण ठेवू शकत नाही किंवा तारण ठेवू शकत नाही.
- कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘भरपाई समितीची स्थापना’ करावी लागते.
- कंपनीला सेबी (भाग आधारित कर्मचारी फायदे) नियम २०१४ च्या तरतुदीचे पालन करावे लागते.
shaalaa.com
भाग विक्रीच्या पद्धती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?