Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
हक्क भाग व बोनस भाग
फरक स्पष्ट करा
उत्तर
मुद्दे | हक्कभाग | बोनसभाग |
अर्थ | हक्कभाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग वाटप केले जाते. कंपनी आपल्या भागधारकांना भाग खरेदी करण्यासाठी प्राथमिकता देते. | बोनसभाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जाते. |
देय रक्कम | कंपनी भागधारकांना हक्कभागाची रक्कम द्यावी लागते. कंपनी हे भाग खरेदी करण्याचा अधिकार देऊ करते. | भागधारकांना बोनसभाग विनामूल्य दिले जातात. |
अंशत: किंवा पूर्णदत्त भाग | भागधारकाला भागांसाठी भाग मागणी शुल्क, भाग वाटप शुल्क, कॉल मनी इत्यादी पूर्ण रकमेचा भरणा करावा लागतो. | बोनसभाग हे पूर्णदत्त भाग आहेत म्हणून भागधारकास कोणत्याही रकमेचा भरणा कंपनीकडे करावा लागत नाही. |
किमान भागभांडवल उभारणी | कंपनीला किमान भागभांडवलची रक्कम उभारावीच लागते. जर कंपनीला किमान भागभांडवलाची रक्कम मिळवता आली नाही तर अर्जासोबत मिळालेली सर्व रक्कम अर्जदारास परत करावी लागते. | कंपनीकडून बोनसभाग विनामूल्य दिले जात असल्याने कोणतीही किमान भागभांडवल उभारणीची रक्कम गोळा करावी लागत नाही. |
हक्क त्याग करणे. | भागधारक हे त्याचे हक्कभाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. | भागधारक त्यांचे बोनसभाग दुसऱ्याच्या नावे करू शकत नाहीत. |
वाटप करण्याचा हेतू | जेव्हा एखादी कंपनी नवीन निधी उभा करू इच्छिते व ती विद्यमान भागधारकांना त्यांच्या भागधारणेत वाढ करण्याची संधी देते. यालाच हक्कभाग वाटप असे म्हणतात. | जेव्हा एखादी कंपनी साठलेला नफा किंवा राखीव निधी विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून देऊ करते त्याला बोनसभाग असे म्हणतात. |
shaalaa.com
भाग विक्रीच्या पद्धती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?