Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
स्थिर भांडवल व खेळते भांडवल
फरक स्पष्ट करा
उत्तर
स्थिर भांडवल | खेळते भांडवल | ||
1. | अर्थ | स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती होय | खेळते भांडवल म्हणजे एकूण चालू मालमत्तेची बेरीज होय. |
2. | स्वरूप | हे भांडवल व्यवसायात जवळ जवळ कायमस्वरूपी राहते. | खेळते भांडवल हे ‘अभिसरण भांडवल’ आहे |
3. | कारण | हे भांडवल स्थिर संपत्तीमध्ये गुंतविले जाते. उदा. जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी. | खेळते भांडवल अल्प मुदतीच्या मालमत्तेमध्ये गुंतविले जाते. उदा. रोकड, मालसाठा, उधारी इ. |
4. | स्राेत | भाग, कर्जरोखे, दीर्घ पल्ल्याचे कर्ज, बंधपत्रे या मार्गाने स्थिर भांडवलाची उभारणी करता येते. | खेळते भांडवल अल्प मुदतीचे कर्ज, ठेवी, व्यापारी कर्जे इत्यादी मार्गाने उभे केले जाते. |
5. | गुंतवणूक- दाराचेध्येय | भविष्यामध्ये नफा कमाविण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार स्थिर भांडवलात पैसे गुंतवितात. | त्वरित परतावा मिळविण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार यात पैसे गुंतवितात. |
6. | जोखीम | स्थिर भांडवलातील गुंतवणूक जोखमीची असते. | खेळत्या भांडवलातील गुंतवणूक कमी जोखमीची असते. |
shaalaa.com
भांडवल आवश्यकता
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?