Advertisements
Advertisements
प्रश्न
ठेवींच्या स्वीकृती बाबतच्या कोणत्याही चार अटी व नियम लिहा.
दीर्घउत्तर
उत्तर
- ठेवींची रक्कम:
- खाजगी कंपनी: खाजगी कंपनी आपल्या सभासदाकडून किंवा संचालकाकडून अथवा त्यांच्या नातेवाईकाकडून वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या १००% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते. तथापि कंपनी कायदा नमूद केल्यानुसार काही खाजगी कंपन्याना वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीच्या१००% पेक्षा जास्त ठेव स्वीकारता येते.
- सार्वजनिक कंपनी (पात्र कंपनी सोडून): जेव्हा ठेव रक्कम वसूल भांडवल व मुक्त राखीव निधीच्या ३५% ची मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल तर अशा वेळी कंपनीस सभासदाकडून ठेवी स्वीकारता येणार नाहीत.
- पात्र सार्वजनिक कंपनी:
- सभासदांकडून: जर कंपनीने ठेव मर्यादा वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांच्या एकत्रित रकमेच्या १०% ओलांडली असेल तर सभासदाकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाहीत.
- सर्वसामान्य जनतेकडून: कंपनीने ठेव मर्यादा वसूल भांडवल व राखीव निधी यांच्या एकत्रित रकमेच्या २५% इतकी ओलांडली असेल तर जनतेकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाहीत.
- सरकारी कंपनी वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या ३५% पेक्षा जास्त रकमेचा ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही.
- कालावधी (ठेवीचा कालावधी): कोणतीही कंपनी सहा (६) महिन्यापेक्षा कमी किंवा ३६ महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा ठेवीचे नूतनीकरण करू शकत नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीत कंपनी तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. परंतु अशा ठेवीची परत फेड ही ठेवी स्वीकारल्यापासून तीन (३) महिन्याच्या आत करता येणार नाही. अशा ठेवीची रक्कम ही वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या १०% पेक्षा जास्त असणार नाही. विशिष्ट परिस्थितीत ठेवीदाराच्या विनंतीनुसार ठेव परत केली जाते. कंपनी ठेव स्वीकारताना अटी कायम ठेवत ठेवीचे नूतनीकरण करू शकते यास नवीन ठेवी स्वीकारणे असे समजले जाते.
- मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी: मागता क्षणी परत करावयाच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही.
- सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी: ठेव स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असावे. सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त (tangible) मालमत्तेवर बोजा निर्मित करते. हा ठेव स्वीकारल्यापासून ३० दिवसाच्या आत निर्माण केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते.
- ठेवीसाठी अर्ज: कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारास पुरविते. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही असे निवेदन देणे आवश्यक आहे.
- संयुक्त नावे: संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते परंतु ही ठेव तीन व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही.
- वारस: कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे. त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम त्याच्या वारसदारास मिळते.
- परिपत्रक/जाहिरात: जेव्हा कंपनी सभासदाकडून ठेवी गोळा करत असते. त्यावेळी परिपत्रकाद्वारे त्यांना कळविण्यात येते. परंतु ज्यावेळी आम जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जाणार असतील अशा वेळी कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते.
- परिपत्रक/जाहिरातीत खालील तपशील/माहिती असते.
- कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र
- नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवींतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवीचे प्रमाण
- पतमानांकन संस्थेकडून मिळालेले पत मानांकन (पात्र कंपनीसाठी)
- ठेव योजना तपशील
- ठेव विश्वस्ताची नावे
- स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी देय रक्कम
- नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद करणे: वरील तपशीलासह परिपत्रक अथवा जाहिरात तयार केल्यानंतर त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येते. यावर सर्व संचालकाच्या स्वाक्षऱ्या असतात.
- परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे: नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतर कंपनी फक्त ३० दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध करत असते. जर कंपनी सभासदाकडून ठेवी स्वीकारणार असेल तर त्यांना रजिस्टर्ड पत्राद्वारे स्पीड पोस्ट अथवा ई-मेल द्वारे परिपत्रक पाठविले जाते. आम जनतेला ठेवी ठेवण्याबाबत आवाहन करावयाचे असल्यास जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. जाहिरात प्रसिद्ध करत असताना देशातील प्रमुख (जास्त खप असणारे) इंग्रजी वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावी तसेच कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेतून जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.
- जाहिरातीची मुदत (वैधता): परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर सहा (६) महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येते. परंतु या दोन्ही तारखांपैकी जी तारीख अगोदर असेल ती तारीख विचारात घ्यावी.
- परिपत्रक/जाहिरातीत खालील तपशील/माहिती असते.
shaalaa.com
ठेवींची स्वीकृतीच्या अटी व शर्ती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?