Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
नाणे बाजार व भांडवल बाजार
फरक स्पष्ट करा
उत्तर
नाणे बाजार | भांडवल बाजार | |
१. | नाणे बाजार म्हणजे अल्पमुदती कर्ज देणे व घेणे होय. | भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे. |
२. | हा सदृश पैशांचा किंवा प्रतिपैशांचा बाजार आहे. म्हणजे अल्पकालीन साधने जसेव्यापारी हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे इत्यादींचा यात समावेश होतो. | हा दीर्घमुदतीचा बाजार असून त्यात रोखे, ऋणपत्रे, समभाग, म्युच्युअल फंड इत्यादींचा समावेश होतो. |
३. | नाणे बाजारात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्त गृह यांचा समावेश होतो. | यामध्ये सरकारी रोखे बाजार, औद्योगिक रोखे बाजार, विकास वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ यांचा समावेश असतो. |
४. | नाणे बाजारात संघटित व असंघटित क्षेत्र अशी दुहेरी रचना, व्याजदरामध्ये समानतेचा अभाव, निधीची कमतरता, हंगामी चढउतार, वित्तीय समावेशनाचा अभाव, तंत्रज्ञान सुधारणेतील दिरंगाई इत्यादी समस्या आहेत. | भांडवल बाजारात वित्तीय घोटाळे, अंतस्थ माहीतगार आणि किंमत गैरफेरफार, कर्जाची अपुरी साधने, व्यापाराच्या प्रमाणातील घट, माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव या समस्या आहेत. |
shaalaa.com
भारतातील नाणे बाजार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?