Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र
फरक स्पष्ट करा
उत्तर
गुणधर्म | सूक्ष्म अर्थशास्त्र | स्थूल अर्थशास्त्र |
१. अर्थ | सूक्ष्म अर्थशास्त्र हा अर्थव्यवस्थेतील विविध आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ, विशिष्ट उद्योगातील मजुरी, विशिष्ट वस्तूंच्या किंमती, घरगुती व औद्योगिक उत्पादन, इत्यादी. | स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेतील समष्टिगत घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. यामध्ये एकूण उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, महागाई दर, एकूण रोजगार, इत्यादींचा समावेश होतो. |
२. संसाधनांचे वाटप | सूक्ष्म अर्थशास्त्र संसाधनांचे वाटप विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनासाठी कसे केले जाते याचा अभ्यास करते. | स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेतील संसाधनांचे वाटप कसे होते यावर भर देते. |
३. दृष्टिकोन | सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आंशिक समतोल विश्लेषण यावर आधारित असतो, ज्यामध्ये इतर गोष्टी स्थिर धरल्या जातात. | स्थूल अर्थशास्त्र सामान्य समतोल विश्लेषण यावर आधारित असते, कारण यात अर्थव्यवस्थेतील प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून असते. |
४. समुच्चयाचा विचार | सूक्ष्म अर्थशास्त्र एका विशिष्ट उद्योगाच्या (जसे की सिमेंट उद्योग, कापड उद्योग) उत्पादन, मागणी, किंमत आणि रोजगार यांचा अभ्यास करते. | स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समुच्चयाचा विचार करते, उदा. एकूण रोजगाराची पातळी, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय खर्च. |
५. आर्थिक घटक | सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म आर्थिक घटकांचा अभ्यास करते, उदा. एखाद्या विशिष्ट उत्पादनाची किंमत, विशिष्ट उद्योगातील मजुरी आणि एका ग्राहकाची मागणी. | स्थूल अर्थशास्त्र समष्टीय आर्थिक घटकांचा अभ्यास करते, उदा. सामान्य किंमत पातळी, देशातील एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत आणि गुंतवणूक. |
६. अभ्यास पद्धती | सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत वापरते, म्हणजेच प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास केला जातो. | स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धत वापरते, ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जातो. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?