English

फरक स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र

Distinguish Between

Solution

गुणधर्म सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र
१. अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्र हा अर्थव्यवस्थेतील विविध आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ, विशिष्ट उद्योगातील मजुरी, विशिष्ट वस्तूंच्या किंमती, घरगुती व औद्योगिक उत्पादन, इत्यादी. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेतील समष्टिगत घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. यामध्ये एकूण उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, महागाई दर, एकूण रोजगार, इत्यादींचा समावेश होतो.
२. संसाधनांचे वाटप सूक्ष्म अर्थशास्त्र संसाधनांचे वाटप विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनासाठी कसे केले जाते याचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेतील संसाधनांचे वाटप कसे होते यावर भर देते.
३. दृष्टिकोन सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आंशिक समतोल विश्लेषण यावर आधारित असतो, ज्यामध्ये इतर गोष्टी स्थिर धरल्या जातात. स्थूल अर्थशास्त्र सामान्य समतोल विश्लेषण यावर आधारित असते, कारण यात अर्थव्यवस्थेतील प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून असते.
४. समुच्चयाचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्र एका विशिष्ट उद्योगाच्या (जसे की सिमेंट उद्योग, कापड उद्योग) उत्पादन, मागणी, किंमत आणि रोजगार यांचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या समुच्चयाचा विचार करते, उदा. एकूण रोजगाराची पातळी, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय खर्च.
५. आर्थिक घटक सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म आर्थिक घटकांचा अभ्यास करते, उदा. एखाद्या विशिष्ट उत्पादनाची किंमत, विशिष्ट उद्योगातील मजुरी आणि एका ग्राहकाची मागणी. स्थूल अर्थशास्त्र समष्टीय आर्थिक घटकांचा अभ्यास करते, उदा. सामान्य किंमत पातळी, देशातील एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत आणि गुंतवणूक.
६. अभ्यास पद्धती सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत वापरते, म्हणजेच प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र राशी पद्धत वापरते, ज्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जातो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×