Advertisements
Advertisements
प्रश्न
ग्राहकांच्या कोणत्याही चार जबाबदार्या स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- अधिकारांचा वापर करणे: ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांस अनेक अधिकार दिले आहेत. ग्राहकाने या अधिकारांबाबत जागरूक राहून वस्तू/सेवांची खरेदी करताना त्यांच्या अधिकारांचा वापर केला पाहिजे.
- सावध राहणे: ग्राहकाने वस्तू/सेवांची खरेदी करताना त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. खरेदी करताना ग्राहकाने वस्तू/सेवेची गुणवत्ता (दर्जा), प्रमाण, किंमत, उपयुक्तता इ. संबंधी चौकशी केली पाहिजे.
- तक्रार दाखल करणे: जर वस्तू/सेवेसंबंधीच्या काही तक्रारी असतील तर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे. जर तक्रार दाखल करण्यास विलंब झाला तर उत्पादनाच्या हमीचा कालावधी पूर्ण होऊ शकतो. काहीवेळा ग्राहकाने व्यावसायिकाच्या अप्रमाणिक कृतीकडे दुर्लक्ष केल्यास व्यवसायाकडून अनैतिक व्यापारी प्रथांचा अवलंब करण्याचे धाडस वाढते.
- दर्जासंबंधीची जागरूकता: ग्राहकाने वस्तूच्या दर्जाशी केंव्हाही तडजोड करू नये. तसेच ग्राहकाने कमी किंमतीच्या लोभासाठी निकृष्ट दर्जाचा माल खरेदी करू नये. जर ग्राहकाने निकृष्ट दर्जाच्या मालावर विश्वास ठेवला तर कोणत्याही क्षेत्राकडून ग्राहकांचे संरक्षण करणे शक्य नसते. म्हणून दर्जेदार वस्तूची खरेदी करणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे. आय.एस.आय., ॲगमार्क, हॉलमार्क, ई.पी.ओ., एफ.ए.एस.एस.आय.इ. मालाचा उत्तम दर्जा दर्शवितात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?