Advertisements
Advertisements
प्रश्न
ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते.
टीपा लिहा
उत्तर
ग्रामीण वसाहतींचे स्थान हे प्रामुख्याने प्राकृतिक घटकांवर अवलंबून असते. जेव्हा ग्रामीण वस्ती विकसित होते, तेव्हा भौगोलिक अनुकूलता या घटकास प्राधान्य दिल्यामुळे पर्वत पायथा, कृषिजमीन, पाण्याची उपलब्धता हे घटक जास्त प्रमाणात विचारात घेतले जातात. साहजिकच तेथे कृषी व कृषिसंबंधित आर्थिक व्यवसाय चालताना दिसतात. थोडक्यात, ग्रामीण भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडित असतो.
shaalaa.com
भूमी उपयोजनाचे वर्गीकरण - ग्रामीण भूमी उपयोजन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?