Advertisements
Advertisements
प्रश्न
ग्रॅफाइट विद्युत वाहक असते हे एका छोटया प्रयोगाने कसे सिद्ध कराल?
थोडक्यात उत्तर
उत्तर
- उद्देश्य: ग्रॅफाइट विद्युतवाहक आहे हे सिद्ध करणे.
- साहित्यः पेन्सिल, विद्युतवाहक तारा, बॅटरी/सेल, लहान बल्ब.
- कृती:
- पेन्सिलला दोन्ही बाजूंनी टोक काढा.
- आता, पेन्सिलीची दोन्ही टोके विद्युत तारांनी जोडा. तारेचे एक टोक सेलला/बॅटरीला व दुसरे टोक छोटया बल्बला जोडा. बल्बची दुसरी बाजू व बॅटरीची दुसरी बाजू आणखी एका छोटया तारेने जोडा.
- परिपथात विद्युत प्रवाह सुरू करा व निरीक्षण करा.
- आकृती:
ग्रॅफाइटमधून विद्युतधारा वाहते. - निरीक्षणः परिपथात असलेला विद्युत बल्ब प्रकाशित होतो.
- अनुमान/निष्कर्ष: ह्या प्रयोगावरून असे सिद्ध होते, की ग्रॅफाइट पेन्सिलमधील हे विद्युत सुवाहक आहे.
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे - कार्बनचे स्फटिक रूप : ग्रॅफाइट
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - स्वाध्याय [पृष्ठ १४९]